May Bapahun Bhimache Upkar Lai Hay Ra Lyrics In Marathi
मायबापाहून भीमाचे
उपकार लई हाय रं
तुमी खाता त्या भाकरीवर
आम्ही खातो त्या भाकरीवर
बाबासायबाची सही हाय रं
काल होतास लाजऱ्यावानी
गावाबाहेर उपऱ्यावानी
मान मर्ताब नव्हती इज्जत
होता जगत कुत्र्यावानी
तुझी वाढली किंमत
ही कोनाच्या पाई हाय रं
या सहीची किमया न्यारी
गेली बदलून दुनियादारी
आज दारिद्र्य दूर पळाले
आलं वैभव दारोदारी
काल कुत्र्यासमान होता,
आज जीनं शाही हाय रं
काल शिकाया नव्हती संधी
पन कायद्यानं उठवली बंदी
आज मोठमोठाले साहेब
खूप झालेत आमच्यामंदी
लिहिलं मनोजराजानं
गानं खोटं नाही आहे रं