He Kharach Ahe Khar Lyrics In Marathi
हे खरंच आहे खरं
हे खरंच आहे खरं
की भीमराव रामजी आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर
महाविरोध कवटाळीला
सारा समाज सांभाळीला
कोटीकोटीचा उद्धार केला हो
शिरी बांधीला मानाचा शेला
अंधरूढीला गुलामगिरीला लावलिया कातर
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर
जातीभेदाच्या तोडिल्या तोफा
मार्ग सत्याचा दाविला सोपा
आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो
बौद्ध धर्माचा टांगलाय सोफा
जाणून महती सुखानं जगती
दलितांची लेकरं
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर
भारताला जी होती हवी
अशी लिहिली घटना नवी
नवज्ञानाचा होता रवी हो
काय वर्णावी ही थोरवी
जोवर धरती हरेंद्रा कीर्ती राहील अजरामर
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर